![]() |
शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयीन वर्गदेखील बंद |
Chandrapur Outbreak Corona: जिल्ह्यात मागील 24 तासात 207 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 265 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून पाच बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
$ads={1}
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 29 हजार 371 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 26 हजार 153 झाली आहे.
Read Also: Chandrapur College Close: शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयीन वर्गदेखील बंद
(Chandrapur Corona Total Cases) : सध्या 2778 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 82 हजार 692 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 50 हजार 116 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
$ads={2}
Chandrapur Corona Death Today: : 05। आज मृत झालेल्यामध्ये सरदार पटेल वार्ड वरोरा येथील 35 वर्ष पुरुष, ब्रह्मपुरी येथील 34 वर्षीय पुरुष, दुर्गापूर येथील 77 वर्षीय व 66 वर्ष पुरुष तसेच बल्लारपूर येथील 82 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 440 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 400, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
Chandrapur Corona Cases Today: आज बाधीत आलेल्या 265 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 92, चंद्रपूर तालुका 17, बल्लारपूर नऊ, भद्रावती तीन, ब्रम्हपुरी 10, सिंदेवाही तीन, मूल 10, सावली सात, राजूरा सात, चिमूर 35, वरोरा 52, कोरपना 15, जिवती एक व इतर ठिकाणच्या चार रुग्णांचा समावेश आहे.
$ads={2}
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.