चंद्रपुर लाईव्ह: वरोऱ्यात जनता कपर्युला जनतेचाचं उत्स्फूर्त प्रतिसाद | Batmi Express Marathi

चंद्रपुर लाईव्ह: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून राज्य सरकारने कडक लॉकडाउन चे संकेत दिले आहे.

चंद्रपुर लाईव्ह,Chandrapur Live,Chandrapur Live News,Chandrapur News,News

चंद्रपुर लाईव्ह:
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून राज्य सरकारने कडक लॉकडाउन चे संकेत दिले आहे. जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असून स्थानिक प्रशासनाने 13 एप्रिल ते 18 एप्रिलपर्यंत जनता कफ्फ्युची घोषणा केली होती.

आज 13 तारखेला गुडीपाडवा सण हा हिंदूंचा नवं वर्ष म्हणून साजरा केल्या जातो. आज जनता कपर्युचा पहिला दिवसाला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत 100 टक्के आपली प्रतिष्ठान बंद ठेवुन सहकार्य केले आहे.

$ads={1}

स्थानिक प्रशासनाने वरोरा शहरातील जनप्रतिनिधी व सामाजिक संस्था यांचे मत जाणून घेतले असता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कपर्यु आवश्यक असल्याचे सांगितले या कफ्फ्युत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.

नागरिकांनी आरोग्य विभागाच्या तपासणी पथकाला सहकार्य करावे अशी विनंती तहसीलदार यांनी केली असून सध्या कोरोना रुग्णासाठी सिद्धिविनायक मंगल कार्यालय अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यांना गृह विलीगिकरण शक्य नाही त्यांना या कोविड सेंटर मध्ये ठेवण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.