'
30 seconds remaining
Skip Ad >

Yavatmal Corona News: जिल्ह्यात रेमडेसिवीर मुबलक प्रमाणात उपलब्ध | Batmi Express Marathi

0

Yavatmal Corona News,Corona News in yavatmal,yavatmal hindi news,yavatmal latest news,yavatmal ki news,yavatmal korona news

Yavatmal Corona News: 
यवतमाळ जिल्ह्यातील ऑक्सीजन पुरवठा ऑक्सि लाईफ गॅसेस व मुकुंदराय गॅसेस यांच्याकडून निरंतर सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. जिल्ह्याची एकूण ऑक्सीजनची मागणी व त्या अनुषंगाने पुरवठ्याचे नियोजन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन व अन्न व औषध प्रशासनामार्फत केले जात आहे. पुरेसा ऑक्सीजनसाठा शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपलब्ध आहे. तसेच गरज भासल्यास नजीकच्या जिल्ह्यातून ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी प्रशासन कटीबध्द आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी प्रभावी ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा जिल्ह्यात नियमित राहण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न सुरु आहेत. सध्या रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असून भविष्यातही ते उपलब्ध राहणार आहे.

$ads={1}

जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालय तसेच विविध तालुक्यातील औषधी दुकानांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहे. यात रिधान मेडिकल स्टोअर्स (डॉ. भारत राठोड हॉस्पीटल, यवतमाळ), श्री स्वामी समर्थ मेडिकल स्टोअर्स (डॉ.ढवणे हॉस्पीटल, यवतमाळ ), पार्श्वनाथ मेडिकल (डॉ. शहा हॉस्पीटल, यवतमाळ), संजीवनी मेडीकल (संजीवनी हॉस्पीटल, यवतमाळ), एशियन फार्मा, यवतमाळ, श्री राधे हेल्थ केअर यवतमाळ, पुसद येथील आयकॉन फार्मा (आयकॉन हॉस्पीटल), दिग्रस येथील अथर्व मेडिकोज, वणी येथील सुखकर्ता मेडिकल (सुगम हॉस्पीटल, वणी) यांचा समावेश आहे.
तसेच रेमडिसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे.
$ads={2}
सर्व रुग्णांना व वैद्यकीय व्यावसायिकांना कळविण्यात येते की, रेमडिसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत काही अडचणी भासल्यास औषध निरिक्षक सविता दातीर यांच्याशी संपर्क करावा, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सविता दातीर यांनी कळविले आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×