Yavatmal Live: कोरोनाबाधित रुग्णांना आवश्कतेनुसार देण्यात येणारे रेमडेसीवीर इंजेक्शन जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून वाटपावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण आहे, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले. खाजगी कोव्हीड रुग्णालयात रेमडेसीवीरच्या तक्रारी संदर्भात जिल्हाधिका-यांनी खाजगी कोव्हीड रुग्णालयाच्या डॉक्टरांशी व्हीसीद्वारे संवाद साधला. Read Also: राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी
$ads={1}
रेमडेसीवर इंजेक्शनची खाजगीरित्या कुठेही विक्री होणार नाही. ड्रग्ज निरीक्षकांच्या सनियंत्रणात खाजगी कोव्हीड रुग्णालयाला विक्री करण्यात येईल. तसेच यावर प्रशासनाचेसुध्दा प्रत्यक्ष नियंत्रण राहील. तसेच खाजगी कोव्हीड रुग्णालयातील बेडक्षमता, भरती असलेल्या रुग्णांची संख्या यानुसार रेमडेसीवीर इंजेक्शन पुरविण्यात येतील.
कोव्हीड प्रोटोकॉलच्या नियमांचे तंतोतंत पालन करून या इंजेक्शनचा वापर करावा. तसेच डॉक्टरांनी कोणत्याही रुग्णाला प्रिस्क्रीपनवर बाहेरून इंजेक्शन आणायला लावू नये. तसेच कोणत्याही परिस्थितीत रेमडेसीवीरचा काळाबाजार, गैरवापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. उपलब्ध असलेल्या इंजेक्शनचा वस्तुनिष्ठ पध्दतीनेच वापर करावा, असेही जिल्हाधिका-यांनी बैठकीत सांगितले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.