Nanded News Live: नांदेडच्या जिल्हा रुग्णालयासमोरील तापलेल्या उन्हाची आजची दुपार... रस्त्यावर शासनाच्या आवाहनाप्रमाणे अत्यावश्यक सुरु असलेली वर्दळ....  रुग्णालसमोर असलेल्या गेटच्या बाहेर आपल्या रुग्णांच्या काळजीपोटी उभे असलेले काही नातलग... असे वातावरण केवळ इथेच नाही तर कोणत्याही कोविड सेंटर बाहेर आपल्याला हमखास पहायला आढळेल. 
$ads={1}
मागील एक वर्षापासून हॉस्पिटलच्या बाहेरची स्थित्यतंरे बदलत आहेत. मात्र, हॉस्पिटलच्या आतमध्ये उपचारासाठी दाखल असलेले कोविडचे रुग्ण आणि प्राण वाचविण्यासाठी अव्याहतपणे सुरु असलेली डॉक्टरांची धरपड, नर्सेस, ब्रदर्स पासून इतर मेडिकलचा स्टॉफला रोजचे युद्ध आहे. त्यांचे हे युद्ध रुग्णांना कोरोनाच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी सुरू आहे. रुग्णालयातील प्रत्येकजण वाटून दिलेल्या जबाबदाऱ्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत पार पाडत आहे. रूग्णालयाबाहेरचे रोज विषय बदलतात मात्र रुग्णालयाच्या चार भिंतीआड कोविड बांधितांच्या आरोग्यासाठी काळजी घेणारी डॉक्टरांचे नियोजन, कामाचा ताण हा तसाच आहे. आत सारेजण आपआपल्या पातळीवर झटताना दिसतात.
कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस जशी-जशी झपाट्याने वाढत आहे त्याप्रमाणात हा ताण आरोग्य यंत्रणेवर वाढत आहे, हे नाकारुन चालणार नाही. उपचार करतांना कांही रुग्णांनी दिलेली सकारात्मक साथ हे वास्तविक पाहिलं तर सर्व आरोग्य यंत्रणेला मिळालेली मोठी शक्ती असते, ऊर्जा असते. मात्र आपल्या आजाराला न समजून घेता, आपल्या जबाबदरीला न समजून घेता पेंशट केवळ वैद्यकीय यंत्रणेवर हल्लाबोल करीत असेल तर कुणाच्याच काही हाती पडणार नाही. आशा वृत्तीतून त्या वार्डात असलेल्या पेंशटसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरही नकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
वैद्यकीय स्थितीचा सध्याचा आढावा लक्षात घेवून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आत्मिक शांतीसाठी वेगळा विचार करुन कोविड वार्डांमध्ये संगीताच्या माध्यमातून वेगळा प्रयोग करता येतो का, याची चाचपणी केली. रुग्णांसह डॉक्टरांनाही सकारात्मक बळ देता येते का याचा विचार केला. यातूनच मग कोविड हॉस्पिटलमध्ये जीवन जगण्याची उर्मी देणारे हॉस्पिटल आपल्या व्यवस्थापनातंर्गत का असू नये याचा विचार पुढे आला.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यांच्यावर अधिक विचार करुन जिल्ह्यातील कांही निवडक कोविड सेंटरमध्ये म्युझिक अर्थात संगीताच्या माध्यमातून नैराश्याच्या वाटेवर असलेल्या रुग्णांना आध्यात्माच्या माध्यमातून, संगीताच्या माध्यमातून बळ देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. 
$ads={2}
लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, एैसी कळवळ्याची जाती, करी लाभे विण प्रिती याची प्रचिती आता कोविड उपचारासमवेत बाधित घेत आहेत. आहे आव्हानात्मक काळात लोकांनी संयम ठेवला पाहिजे. सकारात्मक विचार देण्याची शक्ती महाराष्ट्राच्या लोकधारेत असून अध्यात्माच्या अंगाने संगीताचा माध्यमातून आत्मविश्वास वाढून हस्पिटल मधील वातावरण सकारात्म होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
ही संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नीलकंठ भोसीकर,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सिरसिकर यांच्या नेत्रत्त्वाखाली मेडिकलच्या टीम घेत आहे. 
 
 
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.