'
30 seconds remaining
Skip Ad >

महिलेच्या प्रियकराचा तिच्या 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, मुलगी 7 महिन्यांची गर्भवती..नागपुरातील धक्कादायक प्रकार | Batmi Express

0

Nagpur LIve,nagpur news,Nagpur,crime Nagpur,Nagpur Marathi News,Nagpur Crime,Rape,

नागपूर
: एकाच घरात राहणाऱ्या आईच्या प्रियकराची वाईट नजर तिच्या १७ वर्षांच्या मुलीवर गेली. त्याने आईच्या बदनामीची धमकी देऊन मुलीशी बळजबरी करत मुलीला ७ महिन्यांची गर्भवती केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मुलीला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेंद्र पाथक (५२) हा मूळचा मध्यप्रदेशातील आहे. तो बांधकाम मिस्त्री असून कामाच्या शोधात नागपुरात आला. तो बुटीबोरीत राहायला लागला. त्याच्या सोबत ३६ वर्षीय मजूर महिला काम करीत होती. महिलेच्या पतीने तिला गेल्या १६ वर्षांपूर्वीच सोडले होते. त्यामुळे ती मुलीसह राहत होती. सुरेंद्रला दारुचे व्यसन आहे. महिलेशी ओळख झाल्यानंतर त्याने तिला आर्थिक मदत केली. अविवाहित असून एकटा राहत असल्याचे सांगून महिलेशी जवळिक साधली. महिलेलासुद्धा पती नसल्याची बाब त्याने हेरली. तो तिला सोबत कामावर न्यायला लागला. तसेच त्याने तिला सोबत राहून एकमेकांना साथ देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे महिलाही त्याच्या जाळ्यात अडकली.

तो महिलेच्या घरी राहायला आला. सुरवातीला मुलीने दोघांना सोबत राहण्यास नकार दर्शविला. परंतु, तिच्या आईने तिची समजूत घातली. त्यामुळे आरोपी सुरेंद्र हा मायलेकीसह एकाच घरात राहायला लागला. मागील जानेवारी महिन्यात पीडित मुलीची आई घरी नव्हती. सुरेंद्र हा दारू पिऊन घरी आला. घरात कपडे बदलत असलेल्या मुलीला बघून वाईट नजर तिच्यावर पडली. त्याने तिच्याशी बळजबरी अश्लील चाळे केले. मुलीने चिडून त्याला प्रतिकार केला. सायंकाळी आईला सांगण्याची धमकी दिली. त्याने आईशी असलेल्या प्रेमसंबंधाबाबत तिला सांगितले. तसेच आईची गावात बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने आईला सांगणे टाळले. त्यामुळे सुरेंद्रची हिम्मत वाढली. तो नेहमी मुलीशी अश्लील कृत्य करायला लागला. मार्च महिन्यात त्याने रात्रीच्या सुमारास मुलीला शरीरसंबंधाची मागणी केली. तिने नकार देताच त्याने आईच्या बदनामीची भीती दाखवत बलात्कार केला. त्यानंतर सुरेंद्रने मुलीशी अनेकदा अत्याचार. केला त्यातून ती गर्भवती झाली.

सुरेंद्रने अविवाहित असल्याचे सांगून महिलेशी घरोबा केला. मात्र, सुरेंद्रला पत्नी व तीन मुले आहेत. पीडित मुलगी गर्भवती झाल्यानंतर घाबरली. आईला सांगितल्यास रागावेल, या भीतीपोटी तिने कुणालाच सांगितले नाही. सात महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर आईला संशय आला. मुलीला डॉक्टरकडे नेले. त्यामुळे सुरेंद्रचे कृत्य उघडकीस आले. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पीडित मुलीला मेडिकल रुग्णालयात दाखल केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×