![]() |
The Gadchiroli DCC Bank Ltd |
$ads={1}
बॅंकेतील अधिकारी कर्मचारी दररोज अनेकांच्या संपर्कात येत असतात. अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित आढळले असून काहींचा मृत्यू देखील झाला आहे.अनेक खातेदार दररोज बॅंकेतील अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येत असतात त्यामुळे कोरोनाचा सर्वात जास्त धोका निर्माण होत आहे.
$ads={2}
शासनाने आरोग्य, पोलीस तसेच इतर विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना लस उपलब्ध करून दिली मात्र देशाची अर्थव्यवस्था सुरळीत चालवण्याचा ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा बॅंक अधिकारी, कर्मचाराऱ्यांना मात्र वगळले आहे तरी बॅंकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत दररोज खातेदारांचा होणारा संपर्क व वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ कोरोना लस उपलब्ध करून दयावी अशी मागणी जोर धरत आहे.
Read Also: गोंदिया जिल्हा कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट तर आज कोरोना बाधितांचे त्रिशतक पूर्ण