चंद्रपूर:- जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येत असलेल्या बाम्हण गाव येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना घडली.
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव ऋषीं किसन देवतळे (वय वर्ष ६० ) रा. बाम्हणगांव असं आहे. हि घटना बफर क्षेत्रात घडली आहे. मृतकाचे प्रेत शवविच्छेदन करीता चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले आहे.
सध्या जिल्ह्यात सगळीकडेच शेतीचा हंगाम सुरू असून कुणाची धान रोहनी तर कुणाची डवरण सुरू आहे. याकरिता शेतकऱ्यांची शेतात धावपळ मोठ्या प्रमाणावर सुरू असते. अशातच शेतकऱ्यांवर दैनंदिन वन्य प्राण्याचे हल्ले होत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. शेती जंगलालगत असलेल्या गावकऱ्यांना या मासभक्षक प्राण्यापासून कशाप्रकारे बचाव करता येईल याची काळजी घेणे आवश्यक आहे. वनविभागाने यापुढे अशा घटना घडू नये याकडे लक्ष द्यावे अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.